राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा, यासह विविध विषयावरून सद्यस्थितीत ते राजकारण सुरू आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, हे सर्व थांबले पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. भाजपचे नेते, मनसेचे राज ठाकरे, असो की महाविकास आघाडी सर्व पक्षांमध्ये मध्यस्थी करेन, मी सर्वांशी बोलायला तयार आहे, असंही त्या म्हणाल्या.
घाणेरड्या पद्धतीचे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असा आरोप होत आहे. तर दुसरीकडे, अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावरही अंडी फेकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता.
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. असं बोलणे अत्यंत वाईटच असल्याने यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध नेत्यांनी सर्वांनी निषेधाची भूमिका नोंदवली. याबद्दल मी त्यांचे आभारही मानले होते. मात्र, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घ्यायला तयार आहे. तसेच, प्रत्येक पक्षातील नेत्यांशी बोलायला तयार आहे. मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे’ असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
मला खूप भीती वाटतेय – सुप्रिया सुळे
मुंबई येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा बाबरी ढाचा पाडू असे वक्तव्य केले होते. यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी हसतच, अभिनय करत, ‘मला खूप भीती वाटते’, असं मिश्किल उत्तर दिलं. सुप्रिया सुळे यांच्या उत्तरावर यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…