ताज्याघडामोडी

पत्नीच्या स्वभावामुळे ५ महिन्यातच पतीने संपवलं आयुष्य, स्टेटसला शेअर केला सुसाईड व्हिडिओ

लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यातच एका २५ वर्षीय तरुणाने व्हॉट्सअप्पवर ‘आय क्विट’ असं स्टेटस ठेऊन राहत्याघारी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजनगर मुकुंदवाडी भागात ही घटना घडली आहे. घटनस्थळी पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये पसंतीची पत्नी न भेटल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.

अजय समाधान साबळे वय-२५ (रा. राजनगर, मुकुंदवाडी) असं मृत तरुणाचं नाव आहे.
या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा प्लंबिंगचे काम करायचा. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अजय सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवत होता. त्याच्या मित्रांनी अनेकवेळा त्याला याबाबत विचारणा केली होती. मात्र, त्याने बोलणे टाळले असे त्याचे मित्र सांगतात. रविवारीदेखील त्याने असेच ‘आय क्विट’ असे लिहले आणि फाशी घेतलेल्या अवस्थेतील व्हिडिओ स्टेटसवर ठेवला.

मिळालेल्या माहितीनुसार, अजयने ओढणीच्या साहाय्याने छताला गळफास घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने त्यास फासावरून खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांना अजयच्या खोलीची पाहणी दरम्यान एक सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही. हॉटेलमध्ये जेवायला नेले तर जेवणानंतर जेवणाची थाळी दुसऱ्याकडे नेऊन ठेवते असा उल्लेख आहे. चिट्ठीतील हस्ताक्षर अजयचेच आहे का? याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

22 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago