ताज्याघडामोडी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, BMW कार आणि एसटीमध्ये धडक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे.

सुदैवाने या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, अॅपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा आणि क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

तिन्ही गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर चक्क क्रेनच्या सहाय्याने या गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. धुळे तालुका पोलिसांनी रात्री मदतकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेल्या गाड्या महामार्गावरुन हटवण्यात आल्या आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

21 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago