ताज्याघडामोडी

नवरा-सासूसह चौघांना गुंगीचं औषध पाजलं, पाच लेकरांसह विवाहिता प्रियकरासह पळाली

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका 45 वर्षीय महिलेने जेवणात गुंगीचे औषध मिसळून सासरच्या लोकांना दिले.

यानंतर ही महिला तिच्या 5 मुलांना सोबत घेऊन प्रियकरासह पळून गेली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या वृद्ध सासूसह तिघा सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीच्या आधारे महिला आणि तिचा कथित प्रियकर रवींद्रचा शोध पोलीस घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ग्रेटर नोएडातील थाना डंकौर भागातील एका गावातील आहे. रविवारी सायंकाळी घरातील 45 वर्षीय महिलेने जेवण बनवून त्यात गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर सासू, पतीसह दोघां दिरांना दिल्याने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

जेवल्यानंतर सर्व जण बेशुद्ध पडले. ही महिला आपल्या पाच मुलांसह गावातील रवींद्र नावाच्या प्रियकरासह पळून गेली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार कळला, त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात दाखल केले.

वृद्धेसह चौघे बेशुद्ध

ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, 45 वर्षीय महिलेने जेवण बनवले आणि त्यात गुंगीचे पदार्थ मिसळून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घातले. त्यानंतर सर्व जण झोपी गेले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून 70 वर्षीय वृद्ध महिलेसह चौघा जणांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर महिला आणि तिचा प्रियकर रवींद्र यांचा शोध सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago