शिवसेना आमदार अजय चौधरी यांची हुबेहूब सही करून 78 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न करणाऱया दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. सुकेतू दवे आणि जयेश शहा अशी त्या दोघांची नावे आहेत.
त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार अजय चौधरी यांचे एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. गेल्या आठवडय़ात चौधरी यांचा 78 लाख रुपयाचा चेक बँकेत क्लिअरिंगसाठी आला होता. त्याची शहानिशा करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱयाने चौधरी यांना फोन केला. तुम्ही कोणाला 78 लाखांचा धनादेश दिला आहे का याबाबत विचारणा केली. तेव्हा चौधरी यांच्या मुलाने बँकेशी संपर्क करून आपण कोणालाही चेक दिला नसल्याचे सांगितले.
तो चेक क्लिअर करू नका अशा सूचना देखील बँकेला दिल्या. या घटनेनंतर बँकेने चौधरी यांच्या मुलाला त्या चेकचा फोटो पाठवला. त्या चेकवरची सही चौधरी यांची हुबेहूब असल्याचे उघड झाले. चौधरी याने काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेतली. काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक आनंद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, उपनिरीक्षक पाटणे, लांडगे आदी पथकाने तपास सुरू केला.
तो चेक ज्या खात्यात गेला होता त्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक अहमदाबाद येथे गेले. तेथून सुकेतूला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत जयेशचे नाव समोर आले. जयेशने तो चेक सुकेतूला दिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…