प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनीताई करंदीकर यांचं आज (शुक्रवार) पुण्यात निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजू आत्यावर विशेष लोभ होता व संजू आत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शिवसेनाप्रमुखांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला- उपमुख्यमंत्री
संजीवनीताई करंदीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले. संजीवनीताईंच्या निधनानं बाळासाहेबांच्या भावंडांतील अखेरचा दूवा निखळला आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…