ताज्याघडामोडी

मनसे प्रमुख राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे. उर्दू शब्दांचा वापर धमकीच्या पत्रामध्ये करण्यात आल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बाळा नांदगावकर यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली, याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचे कारण उघड केले आणि राज ठाकरेंना धमकी मिळाल्याची माहिती दिली.

मला एक धमकीचे पत्र मिळाले आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवले आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू, असे पत्रात लिहिल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे पत्र हिंदीत असून त्यात उर्दू शब्दांचाही वापर करण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पत्र कोणी दिले याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आले आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला, तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य सरकारने घ्यावी.

मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी. भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago