पाचोड (खु. ता. पैठण) येथील एका 26 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. विजय बाबासाहेब घुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
विजय घुले याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. सोनेरी भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या नववधूच्या नशिबी मेहंदी सुकण्यापूर्वीच विधवेपण आले. पाचोड (खुर्द) परिसरात शोककळा पसरली आहे.
विजय घुले मंगळवार, 3 रोजी दुपारी रागाच्या भरातून महिनाभरापूर्वीच घराबाहेर पडला. तो कुठे बाहेरगावी गेला असेल असे झाले होते लग्न घरातील नातेवाईकांना वाटले. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कोणत्याच नातेवाईकांकडे गेला नसल्याचे कळले. शनिवार, 7 रोजी सकाळी दहाच्या सुमारास गावालगतच्या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याने काही तरुणांनी विहिरीकडे जाऊन पाहिले. विहिरीत विजय घुले यांच्या मृतदेह पाण्यात तरंगताना असल्याचे आढळून आला.
घटनेची माहिती उपसरपंच नितीन वाघ पोलीस पाटील दिलीप वाघ यांना दिली. त्यांनी बीट जमादार संतोष चव्हाण यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र आंबेकर हे करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…