ताज्याघडामोडी

रामदास आठवले यांनी व्यक्त केली आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा

शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 2014 साली भाजपकडून रामदास आठवले यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले हे सध्या सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागाला रामदास आठवले यांनी सहकुटुंब भेट दिली. ते संगमनेर तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळीच त्यांनी पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डीमधून लोकसभा निवडणूक रामदास आठवले यांना लढवायची असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरवात झाली आहे.

रामदास आठवले हे २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होते. २००९ साली शिर्डीमधून रामदास आठवले यांनी लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत रामदास आठवले यांचा पराभव झाला होता. शिर्डी हा मतदार संघ त्यावेळी आघाडीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक मतदार संघ मानला जात होता. त्यामुळे शिर्डीसारख्या सुरक्षित मतदार संघात झालेला पराभव तेव्हा रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. पराभवानंतर त्यांनी या पराभवाचं खापर नगर जिल्ह्यातील काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांवर फोडले होते.

रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी तत्कालीन कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना जबाबदार धरले होते. मला आपल्याच नेत्यांनी शिर्डीमध्ये पराभूत केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. आता भाजपसोबत रामदास आठवले आहेत आणि २००९ साली रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी ज्यांना जबाबदार धरले होते ते राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा आता भाजपमध्ये आहेत. रामदास आठवले यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात आता मला शिर्डीत मदत कराल ना ? असा गमतीने प्रश्न विचारला होता. आता पुन्हा शिर्डीच्या वाटेवर जाण्याच्या विचारात रामदास आठवले आहेत. पण राधाकृष्ण विखे पाटील यावेळी त्यांना मदत करतील का? यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी शिवसेनेसोबतच्या संबंधाबतही भाष्य केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आमचे सध्या पटत नसले, तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवुन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 week ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 week ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago