हे प्रकरण सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील आहे. 33 वर्षीय मितेश भाई चौधरी यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती.
वरात निघण्यापूर्वी बहुतांश विधी पूर्ण करण्यात आले. थोड्याच वेळात वरात निघणार होती. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होते. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याची इच्छा झाली आणि तोही डीजेजवळ पोहोचला. दरम्यान, नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं.
कुटुंबीयांनी तात्काळ मितेशला मोटरसायकलवर बसवून स्थानिक रुग्णालय गाठलं. जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून बारडोली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही माहिती मिळताच चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली. लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाच्या मृत्यू झाल्यानं हा आनंदाचा क्षण दुःखात बदलला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…