हरयाणातील नरियाला गावात बुधवारी खळबळ उडाली. 85 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूनंतर 7 मुलांची मारामारी झाली. मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाताना तीन वेळा मुलांमध्ये मारहाण झाली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत ज्येष्ठ व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अद्याप कोणत्याही पक्षाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. या मारहाणीत तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीने 7 मुलं आहेत. मात्र सातही जणं वेगवेगळे राहतात. वडिलांच्या मृत्यूनंतर एका मुलाने मोठा मृत्यूभोज कार्यक्रम करण्यास सांगितला. याचा सहाही मुलांनी विरोघ केला. यादरम्यान मुलांमधील वाद वाढला आणि सातही जणं मारामारी करू लागले. यादरम्यान गावकऱ्यांनी त्यांना शांत केलं. मृतदेह स्मशानात घेऊन जातानाच हा सर्व प्रकार घडला. आधी मृतदेह रस्त्याच्या किनाऱ्यावर ठेवून मुलांना शांत करण्यात आलं.
एक मुलगा आणि दोन नातवंड रुग्णालयात दाखल…
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहासमोरच मुलांमध्ये मारहाण सुरू झाली. यानंतर कोणीतरी पोलीस कंट्रोलला फोन करून याबाबत सूचना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतकच नाही तर यावेळी घरात असलेल्या महिलांमध्येही वाद झाला. या वादात एक मुलगा आणि दोन नातवंडाला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…