ताज्याघडामोडी

हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला; भयानक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एक भयानक घटना घडली आहे. एका कारखान्यामध्ये हवा भरताना जेसीबीचा टायरचा स्फोट होतो. या अपघातामध्ये हवा भरण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

3 मे रोजीदुपारी तीन वाजून 50 मिनिटांनी हा अपघात झाला असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

रायपूरच्या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या सिलातारा फेस-2 मध्ये हा अपघात झाला आहे. येथील घनकूल स्टीलमध्ये कर्मचारी जेसीबीचा टायर काढून त्यात हवा भरण्याचे काम करत होते. याच दरम्यान किती हवा भरलीय हे जाणण्यासाठी एक व्यक्ती टायरवर बसतो, परंतु यानंतर अचानक टायर फुटतो. हा स्फोट एवढा भीषण होता की टायरजवळील दोन्ही कामगार हवेत उडतात. यासोबत त्यांचे शरीराचे तुकडेही आजूबाजूला उडतात.

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये मृत झालेले दोन्ही कामगार मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील आहेत. राजपाल सिंह (वय – 32) आणि प्रांजल नामदेव (वय – 32) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी देण्यात आहे, परंतु या प्रकरणी पोलिसांनी अद्याप स्टेटमेंट दिलेले नसून पोलीस दुर्घटनेची चौकशी करत आहेत.

नक्की काय घडलं?

ही सर्व घटना कारखान्यामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. कारखान्यात एक जेसीबी उभा दिसत असून काही कर्मचारी काम करताना दिसताहेत. यातील एक कर्मचारी जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम करत असतो. तर आजूबाजूला दोन कर्मचारी बोलत असताना दिसतात. तेवढ्यात त्यातील एक कर्मचारी हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्याजवळ येतो आणि टायरवर दाब देऊन हवा किती भरली याचा अंदाज घेतो. मात्र त्याच क्षणी टायरचा स्फोट होतो आणि दोघे कामगार हवेत उडतात.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago