ताज्याघडामोडी

‘आता तेच राहिले नाही तर मी जगून काय करू’, म्हणत पतीच्या मृत्यूच्या एका तासांनंतर पत्नीची आत्महत्या

मध्य प्रदेशातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे डॉक्टर पतीच्या मृत्यूच्या एका तासानंतर असिस्टंट प्रोफेसर असलेल्या पत्नीने आत्महत्या केली.

चूना भट्टी भागात राहणारे ४७ वर्षीय डॉक्टर पराग पाठक भाभा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. २८ एप्रिलला सकाळी ९ वाजता डॉक्टर पाठकची तब्येत अचानक बिघडली. पत्नी प्रीति झारिया यांनी पतीला पाणी पाजलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. चेकअप दरम्यान समजलं की, ब्रेन हॅमरेजमुळे डॉक्टरची तब्येत बिघडली. लगेच त्यांची सर्जरी करण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

२ मे च्या रात्री डॉक्टर पराग यांचं निधन झालं. पतीच्या निधनाची बातमी मिळताच पत्नी प्रीति झारिया यांना मोठा धक्का बसला. हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांना प्रीति म्हणाल्या की, आता त्यांच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आता या जगात माझं कुणीही राहिलेलं नाही आणि ती आता आत्महत्या करायला जात आहे. हे बोलून त्या आपल्या कारने हॉस्पिटलमधून निघून गेल्या.

हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या प्रीति यांच्या भावांना डॉक्टरांना सगळी घटना सांगितली आणि तेही बहिणीच्या मागे गेले. पण तोपर्यंत प्रीति यांनी भदभदा वॉटरफॉलवरून उडी मारली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्या आला. पोस्टमार्टमनंतर मतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला. ज्यानंतर पत्नी-पतीची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली.

जबलपूरच्या राहणाऱ्या प्रीति भोपाळच्या नरेला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होत्या. चार वर्षाआधी त्यांचं लग्न झालं होतं. पण त्यांना मुल नव्हतं. मृत डॉक्टर परागचे स्वर्गीय वडील एसडीओ होते. तेच त्यांची आई डॉक्टर आहे. त्या मुलगा आणि सूनेसोबत राहत होत्या. मुलाची तब्येत बिघडल्यावर त्या सूनेसोबत हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या. यादरम्यान सून कार घेऊन गेली आणि तिने आत्महत्या केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago