मराठवाडय़ातून आलेल्या एका तरुणीने बाभळेश्वर येथील तरुणाशी लग्नही केले, हनीमूनही केला आणि विश्वास संपादन करून तीन लाख 70 हजार रुपये घेऊन पोबाराही केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.याप्रकरणी लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुण मामाकडे राहून मोलमजुरीचे काम करायचा. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. संबंधित तरुणाला मात्र बायको मिळाली. अश्विनी (रा. हेळस, जि. जालना) ही तरुणी आणि तिची मावस बहीण रूपा यांचा संबंधित तरुणाशी संपर्क झाला. अश्विनीशी त्याचा विवाह ठरला आणि बाभळेश्वर येथे 4 एप्रिल रोजी लग्नही झाले. लग्नानंतर ते कोल्हापूरला हनीमूनला गेले.
दोन-चार दिवस त्यांचे मजेत गेले. मात्र, 30 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या बस स्थानकावरून अश्विनी आणि रूपा पसार झाल्या. जाताना त्यांनी लग्नासाठी केलेले 70 हजार 915 रुपयांचे दागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही नेली. आपला विश्वास संपादन करून फसविण्यात आल्याने संबंधित तरुणाने लोणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, अनेकजण पैसे देऊन इतर जिह्यातील मुलींशी विवाह करीत आहेत; परंतु लग्नाच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक करणाऱया काही टोळ्या याचा फायदा उठवीत असून, सावध, सतर्क आणि डोळसपणे या गोष्टी करण्याची गरज आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…