रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांच्या कारवाईचा बडगा, अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल या कार्यकर्त्यांना या काळात मुंबईत वावर करण्यात किंवा थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मुंबई घाटकोपर ठाण्याच्या हद्दीत ३ मे रोजी साजरी होणाऱ्या ईद सणाच्या काळात आपण मुंबई हद्दीत वावरु नये. कारण आपण मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकता, असा आदेश यात देण्यात आला आहे. घाटकोपर पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. ACP आनंद नेर्लेकर यांनी यासंबंधीचे आदेश दिले.
संपूर्ण मुंबईभर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ आणि १८८ लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शहरात जमावबंदी आणि सरकारी आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन बड्या नेत्यांची सभा, राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर, तर फडणवीसांचा शिवसेनेवर प्रचंड प्रहार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे.
नोटीस पाठवल्यानंतरही कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाबाबत ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतवरले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी 3 मे रोजी राज्यात महाआरतीचं आयोजन करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली.
कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा इथं एका शेतकऱ्याने आत्महत्या (farmer commits suicide) केली. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने विष घेऊन जीवन संपवल्याची मनहेलावून टाकणारी घटना देवळा तालुक्यातील खुंटेवाडी इथं घडली आहे. महेंद्र भामरे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
त्यामुळे कांद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र भामरे या तरुण शेतकऱ्याने कांद्याचे पिक घेतले होते. मात्र, बाजारात कांदा विक्रीसाठी गेले असता योग्य भाव मिळाला नाही. (होणाऱ्या जावयाने मेव्हणीला नेलं पळवून, मुलीच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय) महेंद्र भामरे या शेतकऱ्याने आज बाजार समितीत कांदा विकला त्याला प्रति क्विंटल 800 रुपये 8 रुपये किलो इतकाच भाव मिळाला.
30 क्विटल कांद्याचे अवघे 24 हजार रुपये हाती येणार होते. एवढ्या खर्चात वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहून महेंद्र भामरे हैराण झाले होते. यातून या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. महेंद्र भामरे यांनी घरी आल्यावर विष घेऊन आपली जीवन यात्रा संपली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…