रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांच्या कारवाईचा बडगा, अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आता हे पाऊल या कार्यकर्त्यांना या काळात मुंबईत वावर करण्यात किंवा थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मुंबई घाटकोपर ठाण्याच्या हद्दीत ३ मे रोजी साजरी होणाऱ्या ईद सणाच्या काळात आपण मुंबई हद्दीत वावरु नये. कारण आपण मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकता, असा आदेश यात देण्यात आला आहे. घाटकोपर पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. ACP आनंद नेर्लेकर यांनी यासंबंधीचे आदेश दिले.
संपूर्ण मुंबईभर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ आणि १८८ लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शहरात जमावबंदी आणि सरकारी आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन बड्या नेत्यांची सभा, राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर, तर फडणवीसांचा शिवसेनेवर प्रचंड प्रहार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाची तयारी सुरु केली आहे.
नोटीस पाठवल्यानंतरही कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणाबाबत ठाम असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतवरले नाहीत तर मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी 3 मे रोजी राज्यात महाआरतीचं आयोजन करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…