ताज्याघडामोडी

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून शिक्षिकेवर बलात्कार

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला.

नराधमाने शिक्षिकेला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये कैद करुन ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव शहरात राहणाऱ्या 36 वर्षीय पीडित शिक्षिका या तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहेत. पीडित शिक्षिका ज्या गावातील शाळेत कार्यरत आहेत त्याच गावाजवळील गावातील शाळेत 46 वर्षीय आरोपी शिक्षक कार्यरत आहे. आरोपी शिक्षकाचं श्रीकांत वानखडे असं नाव आहे. पीडिता आणि आरोपी आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये कार्यरत असल्याने त्यांची खामगाव शहरापासून शाळेत जाताना भेट व्हायची. ते शिक्षकांच्या कारने खामगावरुन ये-जा करायचे. त्यातून दोघांमध्ये चांगली ओळख झाली होती.

या दरम्यान आरोपी शिक्षकाने पीडित शिक्षिकेला काहीतरी कारण सांगत निमंत्रण देत आपल्या घरी बोलावले. शिक्षिका आरोपीच्या घरी आल्यानंतर त्याने घराचे आतील दार लावले. पीडितेने यावेळी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पीडितेला काहीतरी वाईट घडणार याची जाणीव झाली. त्यामुळे तिने घराबाहेर पडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. यावेळी आरोपी वानखेडेने चाकूचा धाक दाखवत पीडितेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने पीडितेचे आपत्तीजनक परिस्थितीतले फोटो काढले. संबंधित घटनेची माहिती कुणाला सांगितली तर फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेन आणि व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.

संबंधित घटनेनंतर पीडिता पूर्णपणे खचली होती. आपल्यासोबत हे काय घडलं, या विचाराने ती आतून ढासळली. अखेर या प्रकरणी आरोपी नराधमाविरोधात लढण्याचा निर्धार तिने केला. पीडितेने तातडीने शहर पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत अत्याचाराची घटना घडली याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित प्रकार ऐकून घेतल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षक श्रीकांत वानखेडे विरोधात कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ ( क), (ब) आणि ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या देखील ठोकल्या. पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago