मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत उल्लेख केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन 4 तारखेपासून ऐकून घेणार नाही, अशी भूमिका मांडली.
राज ठाकरेंच्या या भाषणानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडी आणि काही संघटनांकडून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी तर राज ठाकरे यांच्या भाषणावरुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
“राज ठाकरे जातीवादाचं राजकारण करत आहेत. त्यांना अटक करुन शांतता प्रस्थापित करा. आम्ही या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करा”, अशी भूमिका प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे.
“जेम्स लेन यांचं मूळ पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक यातील शिवाजी महाराज जन्म आणि दादोजी कोंडदेव यांच्याबाबत केलेलं लिखाण सारखं आहे. नंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाच्या कॉपी आलेली आहे. त्यात मग दादोजी कोंडदेव यांच्याबाबत लिहिलेलं लिखाण का वगळलं?”, असा सवाल प्रवीण गायकवाडांनी केला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…