ताज्याघडामोडी

रिक्षातून घाबरून उडी मारल्याने नववीच्या मुलीचा जागीच मृत्यू; तर एक चिमुकली गंभीर जखमी

ठाणगाव रोडवर आटकवडे शिवारात चालत्या रिक्षातून धाबरून उडी मारल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

या अपघातात एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गायत्री अशोक चकणे (१४) रा. वडगाव पिंगळा हल्ली मुक्काम आटकवडे हिचा मृत्यू झाला. तर पाचवीती शिकत असलेली सायली भगवान आव्हाड (११) रा.

आटकवडे ही गंभीर जखमी झाली.

डूबेरे येथील जनता विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन व गुणपत्रिका घेण्यासाठी गायत्री व सायली या शाळेत गेल्या होत्या. गुणपत्रिका घेऊन घरी येण्यासाठी त्यांनी डूबेरे येथून सिन्नरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या समीर अहमद शेख रा. डुबेरे यांच्या अॅपे रिक्षाला हात देऊन त्या पाठीमागे बसल्या.

रिक्षा आटकवडे शिवारात आली असता रिक्षाचालकाला सदर मुलींना तेथे उतरून देण्याचे लक्षात न राहिल्याने तो सरळ चालू लागला. पाठीमागे बसलेल्या मुलींनी त्याला जोरजोरात हाक मारून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकाला मुलींचा आवाज ऐकू आला नाही. मुलींचा आरडाओरडा एकूण रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनीही त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो जोरात पुढे चालू लागला. रिक्षा न थांबल्याने दोन्ही मुली घाबरल्या. यावेळी गायत्री चालत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. तीला बघून सायलीनेही रिक्षातून उडी घेतली. मात्र, रिक्षा जोरात असल्याने गायत्रीने उडी घेताच तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागून ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे वडगाव पिंगळा व आटकवडे गावात शोककळा पसरली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago