नागपूर पोलीस दलाकरीता सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अशा भव्य पोलीस भवनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ, व्यवस्थापकीय संचालक विवेक फळसणकर उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव उपस्थितांमध्ये नसल्याने भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
यावेळी बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आल्यामुळे इमारत तयार होण्यास थोडा उशीर झाला होता. मात्र, आज इमारतीची भव्यता बघून मन प्रसन्न झाले. पोलीस भवन नागपूरच्या विभागात भर घालणारी देखणी वास्तू असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
पोलीस दलातील काही अधिकारी अजूनही समजून घेण्यासाठी तयार नाहीत. कधी आपण ज्युनिअर होतो, आता सिनिअर झाले आहोत. याचे भान ठेवून काम करण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. नागपूर सुधार प्राण्यास (एनआयटी) मार्फत लकडगंज येथे पोलिसांच्या वसाहतीचे काम सुरू आहे. मात्र, ते काम रेंगाळले आहे. मला दिरंगाई चालणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेबाबत काही दिवसांत राज्यात नवीन प्रश्न उभे राहू पाहत आहेत. एखादा विषयाला राजकीय मुद्दा करायचा आणि संघर्ष करायचा, अशी कृती सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली म्हणून सरकारवर आणि पोलीस विभागाला दोषी धरायचे. राज्याचे पोलीस दल असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सक्षम आहे. गेल्या काळात अमरावती, मालेगावात काही घटना घडल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…