विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी थेट सासरच्या दारामध्ये चिता रचून अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या आरग नजीकच्या लक्ष्मीवाडी या ठिकाणी असणाऱ्या एका विवाहित महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. आरती अभिनंदन तळदंगे, वय २६, असे या विवाहित महिलेचे नाव आहे. शुक्रवारी हा सगळा प्रकार समोर आला. त्यानंतर आरती यांच्या कर्नाटक येथील माहेरच्या मंडळींनी लक्ष्मीवाडी या ठिकाणी धाव घेतली. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ करून खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळीने केला. इतकंच नाहीतर संतप्त नातेवाईकांनी पती अभिनंदन तळंदगे याच्या दारामध्ये चिता रचून आरतीवर अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेमुळे लक्ष्मीवाडी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलीस स्थानकात पती अभिनंदन तळदंगे याच्यासह चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी पती, सासू-सासरे आणि नणंदकडून वारंवार छळ करण्यात येत होता. आरतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत होता. त्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचा आरोप मृत आरतीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…