ताज्याघडामोडी

शिवसेना खासदारावर बलात्काराचा आरोप, पीडित महिलेची पोलिसांत तक्रार

शिवसेनेच्या मुंबईतील खासदारावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र, अद्याप या संदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्कर हा आरोप करण्यात आला असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

माझ्या विरोधात लेखी तक्रार एका महिलेने दिली आहे. ही तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करणअयाच्या उद्देशाने हेतुपुरस्कर तक्रार करण्यात आली आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन योग्य निर्णय घेईल असा मला विश्वास आहे. मी निर्दोष असून कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे. माझ्याविरोधात केलेल्या बोगस तक्रारीमागे कोण आहे याचाही पर्दाफाश लवकरच करेन असंही खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago