मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एका 50 वर्षांच्या महिलेला तिच्यापेक्षा 30 वर्षे लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली.
इतकेच नव्हे प्रेमात ही महिला इतकी वेडी झाली की, घर सोडून 20 वर्षांच्या मुलासोबत पळून गेली. याहूनही धक्कादायक म्हणजे ही महिला 7 मुलांची आई आहे. सासरच्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांची सून एका आठवड्यापासून गायब आहे. तिचा शोध घेण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी आता एसपींकडे विनंती केली आहे.
त्यांना 5 मुली आणि दोन मुले आहेत. तीन मुलींचे लग्न झाले आहे. तर दोन मुले 28 आणि 16 वर्षांची आहेत, अशी माहिती महिलेच्या पतीने दिली आहे. महिलेच्या पतीने एसपी कार्यालयात धाव घेतली. तिथे त्याने सांगितले की, त्याचे वय 55 इतके आहे. 35 वर्षांपूर्वी त्या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना सात मुले आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही चधरनपुरवा गावात कापणीच्या कामासाठी गेलो होतो.
एक 20 वर्षीय तरुणही कापणीचे काम करण्यासाठी तेथे आला होता. यादरम्यान माझी पत्नी आणि या तरुणाची मैत्री झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. दोघांमध्ये खूप बोलणे होते. काढणीचे काम संपले आणि त्यानंतर दोघेही सोबतच गायब झाले. पत्नीला शोधण्यासाठी महिलेचे नातेवाईक तरुणाच्या घरी पोहोचले असता त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना धमकावून तेथून हाकलून दिले.
यानंतर पत्नीने हे सर्व विकून टाकले आणि पैशे घेऊन फरार झाली, असे तिच्या पतीने सांगितले. आता परिवारासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. 20 एप्रिलला पत्नी पळून गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी पत्नीचा शोध घ्यावा आणि आरोपी तरुणाला अटक करावी, असे पतीचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यात तक्रार आल्यास तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…