ताज्याघडामोडी

नवऱ्याच्या गरिबीने त्रस्त बायकोनं उचलला आपल्या सौंदर्याचा फायदा, आणि…

प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, ती नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिचा नवरा तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि ते राजा राणीचा संसार करतील. परंतु प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणेच सर्व गोष्टी होतीलच असे नाही. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. आपल्या नवऱ्याकडे पैसे नसल्यामुळे आणि आपल्या नवरा आपल्या इच्छा पूर्ण करत नसल्यामुळे एक महिलेनं असं काही करण्याचा प्लान आखला ज्याचा कोणी विचार देखील केला नसावा.

खरंतर हे प्रकरण राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील आहे. येथे एका महिलेने आपल्या सुंदरतेचा फायदा घेऊन एक प्लान आखला. या महिलेचं नाव आहे रेखा कंवर. ती आणि तिचा नवर तसेच आणखी एका मित्राच्या सहाय्याने एका व्यापाराचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला हनिट्रॅप प्रकरणात अडकवलं.

वास्तविक रेखा पती विक्रम सिंहसोबत झोपडीसारख्या घरात राहत होती. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. रेखाला आलिशान जीवन जगायचे होते. परंतु नवऱ्याकडे पैसे नसल्यामुळे तिच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या.

परंतु रेखा दिसायला सुंदर असल्यामुळे तिने आपला नवरा ज्या मार्बल कंपनीत काम करत होता, त्याच कंपनीच्या व्यापाराला आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर शरिरसंबंध बनवताना रेखाने या व्यापाराचा व्हिडीओ काढला.

त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकी रेखाने व्यापाऱ्याला दिली. ज्याला घाबरुन या व्यापाराने 23 लाख रुपये रेखाला दिले होते. परंतु रेखाची लालसा थांबली नाही आणि तिने आणखी 50 लाखांची मागणी पीडित व्यापाराकडे केली. परंतु यानंतर मात्र रेखा आणि तिचे साथीदार याप्रकरणात पूर्ते अडकले.

नक्की काय घडलं?

नागौर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी मकराना येथे राहणारा मार्बल व्यापारी न सांगता घरातून निघून गेला. 23 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली.

ज्यानंतर पोलिसांना हा व्यापारी सापडला, त्यावेळेस पोलिसांनी व्यापाराची विचारपूस केली असता, त्याने पोलिसांना सगळं प्रकरण सांगितलं. खरंतर हा व्यापारी आत्महत्या करणार होता. परंतु पोलिसांनी नंतर या तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago