ताज्याघडामोडी

ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच विश्वासघात, अत्याचार करत अश्लील व्हिडीओ, नंतर मित्रांसोबत गँगरेप

राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. नागपुरात तर एक सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने ज्या तरुणावर विश्वास ठेवला, त्याच्यावर प्रेम केलं त्याच तरुणाने तिचा विश्वासघात केला. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेला नकळत अत्याचाराचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल (blackmail) करत मित्रांसोबत संतापजन कृत्य केलं. संबंधित घटना समोर आल्यानंतर नागपूर हादरलं आहे. आरोपी नराधम इतक्या विकृतपणे कसा वागू शकतो? असा प्रश्न परिसरातील सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही सतरा वर्षांची असून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

आरोपी यश कांबळे हा पिडीतच्या वस्तीत राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेम प्रकरणात झाले. संधीचा फायदा घेत यशने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. त्या आधारावर तो पीडितला वारंवार ब्लॅकमेल करायचा.

यादरम्यान तिच्यावर ऋषिल खोब्रागडे आणि रक्षित खोब्रागडे यांनी बळजबरीने शारीरिक संबंध बनवले. हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हे धक्कादायक वास्तव पुढे आले. यासंदर्भात पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago