ताज्याघडामोडी

मित्राच्या लग्नात तलवार घेऊन बेधुंद डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकाला बेड्या

लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात मित्राच्या लग्नात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मित्राच्या लग्नात हातात तलवार घेऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्याला मात्र आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यात अशाप्रकारच्या घटना सर्रासपणे घडत असून गुंड प्रवृत्ती फोफावत असल्याचे दिसत आहे. मित्राच्या खांद्यावर बसून ताल धरला.. अन् थेट तलवार बाहेर काढून नाचू लागला.

लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच हळदीवेळी नुसता कल्ला असतो. यातच नाच गाणं आलंच, मात्र हेही एका सीमेपर्यंत ठीक आहे. एका हळदीच्या कार्यक्रमात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण हातात कोयते आणि तलवारी घेऊन नाचत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरदेवासह त्याचे मित्र फरार झाले असल्याची माहिती समोर आली होती.

उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सूर्यकांत गीताराम शिंगाडे असे या तरुणाचं नाव आहे, शहरातील प्रतापनगरच्या मैदानात सूर्यकांतच्या मित्राचे लग्न होते. यावेळी सूर्यकांतने मित्राच्या खांद्यावर बसून ताल धरला आणि थेट तलवार बाहेर काढून नाचू लागला. तसेच या सर्व घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला,त्यानंतर व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहचताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे, तर याप्रकरणी शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago