कामावरुन कमी केल्याच्या रागातून टेलरिंग दुकानातील कामगाराने मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी भागात घडली. या घटनेत मालकिणीसह तिला पेटवून देणाऱ्या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेत एक जण जखमी झाला आहे.
कामगार मिलींद गोविंदराव नाथसागर (वय ३५) आणि दुकान मालकिण बाला नोया जोनिंग (वय ३२ रा. मांदळे निवास, रामचंद्र सभागृहाजवळ, वडगाव शेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत प्रशांतकुमार सुशांतकुमार देबनार जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुुरु आहेत. जोनिंग मूळच्या आसामच्या आहेत.
त्यांचे वडगाव शेरीत ए टू झेड हे टेलरिंग दुकान आहे. जोनिंग महिलांचे कपडे शिवत असत. तसेच दुकानासमोर त्या भाजीपाला विक्री करायच्या. चार महिन्यांपूर्वी नाथसागर त्यांच्या दुकानात कामाला आला. मात्र, तो व्यवस्थित काम करत नसल्याने आठवड्यापूर्वी जोनिंग यांनी त्याला कामावरुन कमी केले होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…