राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे यश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश प्राप्त केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
२०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेतलेल्या परीक्षेमद्धे कर्मयोगी अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी बालाजी रोंगे यांची मृदा आणी जलसंधारण विभागामद्धे जलसंधारण अधिकारी (वर्ग ब) म्हणून नियुक्ती झाली आहे तसेच ओंकार सांगळे यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे.
कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालायामध्ये कुशल अभियंता घडविण्या बरोबर च स्पर्धा परीक्षेची ही तयारी करून घेतली जाते, त्यासाठी महाविद्यालयामध्ये स्वतंत्र “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” ही स्थापन करण्यात आले आहे. त्या मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमद्धे यश मिळविसाठी खूप उपयोग होताना दिसून येत आहे.
स्पर्धा परीक्षेमद्धे यश मिळणार्या विद्यार्थ्यांमद्धे मराठी मुलांचा टक्का कमी आहे त्यामुळे कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी विशेष प्रयत्न केले जात आहेत व त्याचा परिणाम म्हणून च विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेमद्धे उल्लेखनीय यश मिळत आहे. या आधी ही कर्मयोगीच्या अनेक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतून विविध पदांवर निवड झाली असून असे विद्यार्थी भारताचा जबाबदार नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल व महाविद्यालयाच्या कार्याबद्दल विद्यार्थी व पालक वर्गामद्धे आनंदाचे वातावरण आहे.
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक, कर्मयोगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…