जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील तरडगाव येथे घडली आहे. या आईला लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पांढरी तरडगाव येथे आरती सोमनाथ गायकवाड ही महिला राहते. या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करून तिच्या पाच महिन्यांच्या लहान बाळाला 12 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता जिवे ठार मारून पुरले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा. नाहीतर मी आणखी कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, पोलीस नाईक वाघमोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अहिवळे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली.
यावेळी महिलेने आपला मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून ठार मारून पुरून टाकल्याचे सांगितले. आज (दि.24) वाई उपविभागाच्या पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर घटनास्थळी दाखल झाले.
चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी खोदण्यात आले असता मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शककिच्छेदन जागेकरच करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किठ्ठल काळे यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली असून, महिलेकर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…