जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे खासगी स्वीय्य सहायक राहुल राजळे यांच्यावर काल रात्री नेवासा तालुक्यात हल्ला झाला.
राजळे गेल्या काही वर्षांपासून गडाख यांच्याकडे काम करीत आहेत. शुक्रवारी रात्री सोनई येथील काम अटोपून ते घोडेगाव मार्गे आपल्या घरी दुचाकीवरून निघाले होते. राजळे लोहगाव येथील आपल्या घराजवळ येताच पाळत ठेवून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सुमारे पाच गोळ्या आरोपींनी झाडल्या.
त्यातील एक राजळे यांच्या पोटात तर दुसरी डाव्या पायाला लागली आहे. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. राजळे यांना नगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. रात्रीच डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली. आरोपी घोडेगाव परिसरात राहणारे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मार्फत कोणी तरी हा हल्ला घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या मागे तालुक्यातील राजकीय कारण असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.
गेल्या काही काळापासून राजळे मंत्री गडाख यांच्याकडे काम करीत आहेत. गडाख यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. नेवासा तालुक्यात सध्या टोकाची राजकीय स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच हा प्रकार झाल्याचा संशय घेतला जात आहे. यामागे वैयक्तिक अगर इतर कारण असल्याची शक्यता राजळे यांच्या निकटवर्तीयांनी फेटाळून लावली आहे.
हल्ल्याची घटना घडल्यानंतर मंत्री गडाख यांनीही यामध्ये लक्ष घातले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. संशयित आरोपींची नावे पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…