बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वार्षिक निकालाची द्वितीय प्रत, विविध दाखल्यांवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेण्यासाठी यापुढे विद्यार्थी, पालकांना वारंवार शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात खेटे मारण्याची गरज नाही.
येत्या 1 मेपासून विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या 105 हून अधिक सेवांसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने ठराविक कालमर्यादा ठरवली आहे. शिक्षण आयुक्तालयामार्फत विविध लोकसेवांची हमी देणारे परिपत्रकच जारी करण्यात आले असून येत्या महाराष्ट्र दिनापासून राज्यभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे आता शिक्षकांची मेडिकल बिले मंजुरी, बदली, समायोजन, पदमान्यता, भविष्य निर्वाह निधी मंजुरीची प्रकरणेही वेळेत पूर्ण होणार आहेत.
लोकसेवा हमीसंदर्भात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लेखी आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या द्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱया सेवा पारदर्शी पद्धतीने व मुदतीत देणे अधिक सुकर झाले आहे. हा अधिनियम राज्यात लागू झाल्यानंतर प्रत्येक मंत्रालयीन विभागाने काही सेवा या अधिसूचित केल्या आहेत.
परंतु तेवढय़ाच सेवा देणे अपेक्षित नसून त्याव्यतिरिक्त नागरिकांच्या गरजेनुसार तसेच प्रशासकीय शिस्त येण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा लोकांना पुरविणे गरजेचे आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागातील विविध सेवा विद्यार्थी व शिक्षकांना 1 मेपासून वेळेत पुरविण्यात येणार आहेत. यासाठी कार्यालयांच्या स्तरावर कार्यवाही करावी, अशा सूचना मांढरे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थी, शिक्षकांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱया अधिकाऱयांविरोधात अपीलही करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना या सुविधा वेळेत मिळणार
बोनाफाईड प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची द्वितीय प्रत, शाळा सोडल्याचा दाखला सात दिवसांत मिळणार.
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी एका दिवसात देणे.
योग्यता प्रमाणपत्र प्रस्ताव विभागीय मंडळास सादर करण्यास 30 दिवसांची मुदत.
योग्यता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय 20 दिवसांत होणार.
विद्यार्थ्यांचे जात, नाव, जन्मतारीख व इतर यामध्ये बदल मान्यता आदेश देण्यास 7 दिवसांची मुदत.
राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदानासाठी 15 दिवस.
पाचवी-आठवी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांची नावे अद्ययावत करण्यास 30 दिवसांचा वेळ.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…