राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
पैसे न दिल्यास तुमच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करेन आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकीही या महिलेने धनजंय मुंडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत धनजंय मुंडे यांनी आपण या महिलेला ओळखत असल्याचे नमूद केले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले. याशिवाय, एक महागडा मोबाईलही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असेही धनजंय मुंडे यांनी सांगितले आहे.
मलबार हिल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. आता या तपासातून कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.करुणाताई एक रेकॉर्डिंग लवकरच पवारांना ऐकवणार, मग पाहा तुमचं काय होतंय; मनसेचा धनंजय मुंडेंवर पलटवार
प्रकरण नेमकं काय?
धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी या महिलेने धनंजय मुंडे यांना दिल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका नव्हे तर भोवळ आल्याची माहिती दिली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…