बिहारच्या कैमूरमध्ये एका व्यक्तीने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून पळ काढला. घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून पुढील प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली.पोलिसांनी हत्येच्या अवघ्या 36 तासांमध्ये आरोपी व त्याच्या प्रेयसीला अटक करून गुन्ह्याची उकल करण्यात आली.
आपल्या अवैध संबंधाना पत्नीचा विरोध असल्याकारणाने मी तिची हत्या केली, असे आरोपीने पोलिसांसमोर कबूल केले. मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बघिनी गावातील ही घटना आहे. 15 एप्रिल रोजी आरोपी जनक चौधरी त्याच्या बायकोला घेऊन बांसवाडी भागात गेला होता. तिथे त्याने बायकोची गळा चिरून हत्या केली. या प्रकाराची माहिती जनकच्या घरच्यांना कळताच, जनकच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मोहनिया पोलीस उपअधीक्षक फैज अहमद खान यांनी सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला होता. यामध्ये पोलिसांना दिसून आलं होतं की जनक चौधरी खून करण्यापूर्वी आणि खुनानंतर एका महिलेशी फोनवर बराच वेळ बोलला होता. पोलिसांच्या तांत्रिक तपासाच्या आधारे जनकला रोहतास जिल्ह्यातील दालमियानगर येथे अटक केली.
त्याने फोनवरून केलेल्या संभाषणाच्या आधार पोलिसांनी त्याला साथ देणाऱ्या त्याच्या प्रेयसीलाही भभुआ रोड रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. तपासादरम्यान दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जनक चौधरी याचे विवाहबाह्य संबंध होते, त्यात बायको अडसर ठरत असल्याने त्याने बायकोचा खून करायचं ठरवलं होतं. प्रेयसीसाठी बायकोला ठार मारणाऱ्या जनकला 3 मुलं आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…