राज्यातील सत्ताधारी मविआ आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. यात दोन्ही बाजूने रोजच आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे.
हे सरकार पडणार असल्याचे अनेकवेळा भाजप नेत्यांकडून विधाने करण्यात आली. आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. जून महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून जाणार असल्याचे राणे यांनी म्हंटले आहे.
नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्या इकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या अगोदर एक वादळ यायचे. त्यात हलणारी झाडे हि फांद्या सकट कोसळून पडतात.
महाविकास आघाडी हे तीन पक्षाचे एक झाड आहे. या तीन पक्षाच्या झाडावच्या फ़ांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते मुख्य खोडावर बसलेले नाहीत. त्यामुळं हे सरकार जून महिन्याच्या अगोदरच कोसळणार, जय हिंद जय महाराष्ट्र.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…