कल्याणमधील एका झाडू विकणाऱ्या महिलेच्या कृतीमुळे समाजात आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यय आला आहे. या महिलेने तब्बल दोन लाख रूपये किंमत असलेलं सोन्याचं ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत केले आहे. जाहिदा शेख (वय, 60) असे या महिलेचे नाव आहे.
कल्याणच्या सहाय्यक आयुक्त पोलीस कार्यालयाजवळ नाराळाच्या झावळ्या आणि बांबूपासून तयार केलेल्या केरसुन्या, टोपल्या आणि सुपड्या विकून जाहिदा या आपला उदारनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या दुकानासमोर एक सोन्याचं ब्रेसलेट सापडलं होतं.
या ब्रेसलेटची किंमत दोन लाख रुपये होती. जाहिदा यांनी प्रामाणिकपणा दाखवत हे ब्रेसलेट पोलिसांकडे दिले. पोलिसांनी संबंधितांना ते परत केले. जाहिदा यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत
जाहिदा यांना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यात पडलेले सोन्याचे ब्रासलेट सापडले. त्यांनी याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जवळपास एका तासाने एक तरुण ब्रेसलेट शोधण्यासाठी या परिसरात आला. त्याने आजूबाजूला ब्रेसलेटबाबत विचारणा केली.
त्यावेळी ते ब्रेसलेट पोलिसांकडे जमा केल्याची त्याला माहिती मिळाली. त्यामुळे त्याने वाहतूक पोलिसांसोबत संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी शहानिशा करून तरुणाला ब्रेसलेट परत केलं आणि जाहिदा यांनी ते पोलिसांकडे जमा केल्याचे सांगितले. ब्रेसलेट परत मिळाल्यामुळे संबंधित तरूणालाही खूप आनंद झाला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…