सातारा, 14 एप्रिल : भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबईच्या गिरगाव कोर्टाने त्यांना याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी गिरगाव कोर्टात दाखल होत सदावर्तेंचा ताबा मागितला होता. कोर्टाने त्यांना परवानगी दिली होती.
त्यानंतर सातारा पोलीस सदावर्ते यांना मुंबईच्या कारागृहातून आज साताऱ्यात घेऊन आले. या सर्व घडामोडीदरम्यान सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन जवळपास दोन कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी कोर्टात केला. एकीकडे जामीन मंजूर न होणं आणि दुसरीकडे आर्थिक घोटाळ्याचा आरोप असताना सदावर्ते अजूनही जोशातच दिसत आहेत. सातारा पोलीस ठाण्याबाहेर आज संध्याकाळी दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांनी ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी केली.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संप सुरु आहे. या संपादरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते हे कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे आले. ते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलनातही सहभागी झाले.
या दरम्यान ते राज्य सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्यात असलेला तोच उत्साह आणि जोश आजही सातारा पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाल्यानंतर बघायला मिळाला. त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असतानाही ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी केली.
दरम्यान, सदावर्ते सातारा पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे कळताच मराठा समन्वयकांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. छत्रपती घरण्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे आणि कोणी असे शब्द वापरतील तर त्यांच्या विरोधात मराठा समाज पेटून उठेल, असा इशाराच यावेळी मराठा समन्वयकांनी दिला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…