ताज्याघडामोडी

शिकाऱ्यांकडून घोरपडीवर बलात्कार; पोलिसांकडून आरोपींना अटक

कोल्हापुरात गोठणेजवळ असणाऱ्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चक्क एका घोरपडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. विनापरवाना शस्त्रासह व्याघ्रप्रकल्पात घुसल्यानंतर अटकेची कारवाई केली असता हा प्रकार समोर आला. आरोपींचे मोबाइल तपासण्यात आले असता हे विकृत कृत्य उघडकीस आलं.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातातील चांदोली वनपरीक्षेत्रातील गोठणे नियतक्षेत्रात शिकार कऱण्याच्या उद्धेशाने हे आरोपी शिरले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं संदीप तुकाराम, मंगेश पवार, जनार्दन कामटेकर आणि अक्षय सुनील आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींचे मोबाईल तपासले असता ही घटना समोर आली आहे. मोबाइलमध्ये आरोपी घोरपडीवर सामूहिक बलात्कार करत असल्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. सीसीटीव्हीत हे आरोपी जंगलात फिरताना दिसत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी कोकणातून कोल्हापुरच्या चांदोली गावात शिकारीसाठी आले होते.

आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची याबद्दल सध्या अधिकारी चर्चा करत आहेत. दोषी आढळल्यास, आरोपींना सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. आरोपींना कोर्टात हजर केलं असता वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago