ताज्याघडामोडी

कीर्तनासाठी जाताना इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

सुप्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे. काल इंदोरीकर महाराज जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

जालना तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळल्याने हा अपघात झाला. माहितीनुसार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलिसांची एक टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे किर्तन नियोजित वेळेत पार पडले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागिरकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago