कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज एक गौप्यस्फोट केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला फुस लावल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वेगळं वळण लागलं आहे.
या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद आहे. आता चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याचं तिने म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरूनच आपण हे सगळं केलं असल्याचं पीडिता म्हणत आहे. शिवाय मला सुसाईड नोट लिहिण्यास देखील चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा गंभीर आरोप देखील पीडित मुलीने केला आहे. शिवाय, खोटे मेसेजही वाचून दाखवले असून हे मेसेज मी पाठवले नाहीत किंवा कुचिकनेही पाठवले नाहीत, त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना सांगणार असल्याचेही आताा पीडिता म्हणत आहे.
गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले गेले. पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी मला भाग पाडले. काल भाजपाच्या एका व्यक्तीने एक पत्र आणून दिले. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती माझ्यावर केली जात आहे. हे सर्व आरोप पीडित तरुणींने केले आहेत.
शिवाय, आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील एका व्हिडिओद्वारे शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच, असं सागंत या प्रकरणावर विशेष टिप्पणी केली आहे. तसेच, आपण पीडितेची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…