पंढरपुरात घडला खबळजनक प्रकार

पंढरपूर शहरात राहणारे एका कुटूंबातील पती पत्नीने आपली शारीरीक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीम मध्ये 18 जानेवारी 2022 रोजी पासून जाणे चालू केले होते.त्यांनी जीम मध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जीम मध्ये दिलेले होते सुरवातीस जीम मधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड रा. पंढरपूर याने डायटस घेण्याची माहिती देणेसाठी विवाहीत स्त्रीस तिचे मोबाईलवर फोन करण्यास सुरवात केली.त्यानंतर श्रीकांत गायकवाड याने या स्त्रीचे मोबाईल फोनवर कॉल करुन तसेच वॉटसअप मेसेज करुन तिचेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला त्याचवेळी या स्त्रीने त्यास तुम्हाला ज्या कांही सूचना दयावयाच्या असतील त्या आम्ही जीम मध्ये आल्यावर देत जा असे सांगीतले.

तरी देखील श्रीकांत गायकवाड हा वेळी अवेळी तिचे मोबाईलवर कॉल करणे, वॉटसअप मेसेज,वॉटसअॅप व्हिडीओ कॉल करणे, इन्टाग्राम चॅटींग, फेसबुक चॅटीग ,स्नॅपचॅट अशा प्रकारे चॅट करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. हि विवाहित स्त्रीचे पती ज्यावेळी कामानिमीत्त बाहेर असताना ती एकटी जीममध्ये जात होती त्यावेळी त्या संधीचा फायदा घेवून श्रीकांत गायकवाड हा या विवाहित स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे तसेच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करुन वाईट हेतुने तिचे अंगाला स्पर्श करणे असे प्रकार करत होता. श्रीकांत गायकवाड याचेकडून या होत असलेल्या कृत्या बाबत या विवाहित स्त्रीने तिचे पतीस सांगीतलेवर त्या दोघांनी जिम सोडण्याचा निर्णय घेतला व जीम मध्ये जाणे बंद केले.त्यानंतर आरोपी याने पीडीत स्त्रीला तीचे व्हॉटसअॅप चॅटींग,फोटो तीच्या पतीला दाखवण्याची धमकी वेळोवेळी दिली.

परंतू पीडीत स्त्रीने आरोपी श्रीकांत राजू गायकवाड याचे पासून होत असलेला त्रास तीला असहय झाल्याने पिडीत स्त्रीने आपले पती समवेत पंढरपूर शहर पोलीस ठाणेत येवून श्रीकांत राजू गायकवाड रा.पंढरपूर याचे विरोधात तक्रार दिल्याने दि 10/04/2022 रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणेत गुन्हा रजि क्र 264/2022 भारतीय दंड संहिता कलम 354,354(अ),354(क),354(ड),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला काल रात्रौ पोलीसांनी अटक केली आहे .सध्या आरोपी पेालीस कोठडी मध्ये आहे. या दाखल झालेल्या गुन्हयात श्रीकांत राजू गायकवाड,26वर्षे,रा.पंढरपूर यास पोलीसांनी अटक केली असून गुन्हयाचे तपासात या अटक आरोपीने पंढरपूर शहरातील वेगवेगळया जीम मध्ये तसेच सध्या कार्यरत असलेल्या जीम मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असताना ब-याच महीला व मुलींची लैंगीक छळवणुक केली असल्याची माहिती समोर आली आहे.महीला व मुलींना गोड बोलून,त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईल द्वारे चॅटींग करून त्यांना अलगदपणे त्यांना खोटया प्रेमाच्या जाळयात ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपी श्रीकांत राजू गायकवाड वय 26 वर्षे रा. पंढरपूर याचेकडून महीला व मुली यांची छळवणुक झाली असल्यास या आरोपी विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे.तक्रारदाराचे नांव पत्ता गोपनिय ठेवणेत येईल असे पंढरपूर शहर पोलीस ठाणेे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.तेजस्वी सातपुते मॅडम,मा.पोलीस अधिक्षक सोा.,सोलापूर ग्रामीण,श्री.हिंमत जाधव सो,मा.अपर पोलीस अधिक्षक सोा.,सोलापूर ग्रामीण,श्री.विक्रम कदम,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सोा.,पंढरपूर उपविभाग पंढरपूर,श्री.अरुण पवार,मा.पोलीसनिरीक्षक,पंढरपूर षहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर निर्भया पथकाचेश्री.प्रशांतभागवत,पोलीस उपनिरीक्षक, श्री दत्तात्रय आसबे,सहा.पेालीस उपनिरीक्षक, पोना/प्रसाद औटी, पोकॉ/निलेश कांबळे,पोकॉ/अरबाज खाटीक, मपोना/निता डोकडे, मपोकॉ/कुसुम क्षिरसागर, चापोहेकॉ/अविनाश रोडगे यांनी केली आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

6 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

6 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago