ताज्याघडामोडी

धावत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट; चालकाला आग लागल्याचे समजलंही नाही

परभणी शहरापासुन काही अंतरावर लातूरहून नागपुरकडे जाणाऱ्या धावत्या ट्रॅडल्सला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे .

विशेष म्हणजे गाडीला आग लागल्याचे चालकाला समजलेच नाही. सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील चाळीस प्रवाशी बालबाल बचावले आहेत .

लातूरहून परभणी मार्गे नागपुरला जाणारी एम . एच . 40 वाय 9135 क्रमांकाची ट्रॅव्हल्स प्रवाशी घेऊन शनिवार 9 एप्रिल रोजी लातुरहुन निघाली होती. दरम्यान परळी ते गंगाखेड दरम्यान गाडी नादुरुस्त असल्याचे प्रवाशांना जाणवले होते . चालकाने टायरची हवा तपासुन गाडी पुढील प्रवासासाठी परभणीकडे निघाली असता ब्राम्हणगाव शिवारात ट्रॅव्हल्सच्या बॅटऱ्यांना अचानक आग लागली .

ट्रॅव्हल्सला आग लागली असल्याची माहीती मात्र चालकाला नव्हती . पाठीमागुन येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाने बसला आग लागली असल्याचे सांगितल्यानंतर ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवाशी खाली उत्तरविण्यात आले . यावेळी प्रवाशी घाबरल्याने धावपळ झाली .

या घटनेत एक प्रवाशी किरकोळ जखमी झाला आहे .दरम्यान पो . राहिरे , पोलिस कर्मचारी लिंबाळकर हे पेट्रोलिंगसाठी जात असताना ट्रॅव्हल्सला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . याबाबतची माहिती या पोलीस पथकाने तात्काळ कंट्रोल रुमला दिली आणि जखमीला परभणी येथील येथील रुग्णालयात पाठविले होते . दरम्यान अग्निशामक बंबाने आग विझवेपर्यंत ट्रॅव्हल्स जळून खाक झाली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

12 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago