पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने शनिवारी कोविशील्ड या आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या किंमतीत निम्याहून अधिक कपात केली आहे. त्यानुसार, आता खासगी रुग्णालयात या लसीचा एक डोस 600 ऐवजी अवघ्या 225 रुपयांना मिळेल.
देशातील सर्वच प्रौढ नागरिकांना बुस्टर डोस देण्याची घोषणा केंद्राने शुक्रवारी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोव्हिशिल्डच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनावाला यांनी शनिवारी एका ट्विटद्वारे केंद्र सरकारशी विस्तृत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, या लसीचा 600 रुपयांचा एक डोस आता अवघ्या 225 रुपयांना मिळेल.
दुसरीकडे, हैदराबाद स्थित भारत बायोटेकनेही आपल्या कोव्हॅक्सिन लसीच्या बुस्टर डोसची किंमत 1200 हून 225 रुपये करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या अधिकारी सुचित्रा इल्ला यांनी एका ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्यांनीही केंद्रासोबत सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…