वीज वापराची नोंद वीजमीटरमध्ये कमी प्रमाणात होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करून 71 हजार 420 रुपये किमतीची वीजचोरी केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय नरसिंह चिंतामणी व पंकज दत्तात्रय चिंतामणी (दोघे रा. सिद्धिविनायक सोसायटी, सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत (रा. रासणेनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
कार्यकारी अभियंता सावंत यांच्या भरारी पथकाने 11 मार्च रोजी दत्तात्रय चिंतामणी यांच्या घरी मीटरची तपासणी करण्यासाठी भेट दिली होती. तपासणीत मीटर 78.84 टक्के मंद गतीने चालत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले.
एकूण 71 हजार 420 रुपये किमतीची तीन हजार 467 युनिट वीजचोरी केल्याप्रकरणी चिंतामणी यांना तडजोडीअंती आठ हजार रुपये रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले होते. चिंतामणी यांनी ती रक्कम भरली नसल्याने अखेर गुरुवारी (दि. 7) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…