ताज्याघडामोडी

औरंगाबादच्या कीर्तनकार बाबाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल  झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे किर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गेली अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा महिलेसोबत ‘शरीरसंबंध’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

कारवाईची मागणी…

या किर्तनकार महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. व्हिडिओमधील दोघेही “आनंद संप्रदायिक” आहेत.

त्याच विचारसरणीला मानणाऱ्या समाजामध्ये किर्तनकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. आनंद संप्रदायिक असूनही बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानत आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात.

मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तनुकीचे अश्लील प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago