आ.रोहित पवार यांना काल बोलायची राहून गेलेली गोष्ट !

काल कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या मतदार संघातील भाविकांसाठी ६५ एकर पलीकडील शेगाव दुमाला अथवा भटुंबरे हद्दीत ते स्वतः उभारत असलेल्या संत छाया निवास या भव्य भक्त निवासाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला.आणि यावेळी मीही उपस्थित होतो.
यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद देखील साधला पण गडबडीत असल्याने ते फारसा वेळ देऊ शकले नाहीत आणि माझा प्रश्न प्रश्नच राहिला.
पंढरपूर शहराच्या हद्दीत सर्वसामान्य सरकारी नोकरदार नसलेल्या,बागायतदार शेतकरी नसलेल्या,मोठमोठे व्यवसाय नसलेल्या कष्टकरी लोकांसाठी अर्धा गुंठा जागा घेऊन स्वतःच्या हक्काचे घर बांधणे महामुश्किल झाले आहे.कारण आहे या शहरात राज्यातील वारकरी भाविक हे एकत्र येऊन चढ्या किमतीने जागा खरेदी करून मठाचे बांधकाम करत असल्याने शहरातील जागांच्या किमती या अक्षरशः सोलापूर पेक्षाही दुप्पट तिप्पट आहेत,मुंबईशी स्पर्धा करत आहेत.
त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेला हक्काच्या घरासाठी जागा खरेदी करणे हेच एक मोठे दिव्य होऊन बसले आहे.बांधकाम तर दूरची गोष्ट आहे.त्यामुळे या शहरातील गोरगरीब कष्टकरी वर्ग कासेगाव हद्दीतील अगदी कासेगाव,टाकळी, कोर्टी,भटूबरे ,शेगाव दुमाला,आढीव विसावा,गुरसाळे,वाखरी गावठाणा पर्यंत अर्धा गुंठा,गुंठा मिळतो का याचा शोध घेताना दिसून येतो.
अशातच राज्य शासनाने जून २०२१ मध्ये गुंठेवारी खरेदी विक्री दस्त नोंदणी वर निर्बध आणल्याने येथील कष्टकरी सामान्य लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.राज्य शासन मोठं मोठ्या शहरामध्ये म्हाडा,सिडको च्या माध्यमातून निरनिराळ्या गृहप्रकल्पाची योजना राबविते मात्र पंढरपुरात अशी कुठली योजना राबविण्यात आली नाही.१०९१ मध्ये गोपाळपूर येथे म्हाडाच्या माध्यमातून एक योजना झाली त्यानंतर आज तागायत आपल्या इथे म्हाडाचे घोडे अडले ते अडलेच.
आपल्या नगर पालिकेने म्हणे शहरातील ४ हजार बेघर अथवा स्वमालकीची घरे नसलेल्याची यादी तयार केली आणि त्यांच्यासाठी प्रधान मंत्री आवास योजनेची २ हजार ९१ घरांची योजनाही राबविली हजारभर घरे बांधून पूर्णही झाली.लाभ किती जणांना झाला ? एक वर्ष झाले सोडत काढून तरीही या योजनेस का प्रतिसाद मिळाला नाही हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.(यात अजून एक गमतीदार बाब आहे.आपल्या सक्षम नगर पालिकेच्या प्रधान मंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवर जाऊन शहरातील बेघर लोकांच्या यादीच्या ऑप्शनवर क्लिक करा.जी यादी ओपन होते ती पाहून कोड्यात पडल्या शिवाय रहाणार नाही )
आज पंढरपूर शहराची हद्द वगळता शहरा नजीक असलेल्या कोर्टी,टाकळी,कासेगाव,शेगाव दुमाला,भटुंबरे,वाखरी या हद्दीत मोठं मोठे टोलेजंग मठ उभारलेले दिसून येतात.सामान्य लोकांसाठी एक-दोन गुंठ्याचे प्लॉट्स पाडून काही बांधकाम व्यसायीक विक्री करत आहेत.पण तेथेही बहुतांश नागरी सुविधांचा अभाव आणि महाराज मंडळींची गर्दी दिसून येते.
त्यामुळंच शासनाने जून २०२१ मध्ये गुंठेवारी दस्त नोंदणी बाबत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे याचा विचार करून पंढरपूर प्राधिकरण हद्दीत गुंठेवारी दस्त नोंदणीस विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करावा आणि गेल्या ३० वर्षात पंढरपूर शहराची हद्दवाढ झाली नाही,त्यामुळे शहरा नजीकच्या ग्रामपंचायत हद्दीतील नागरी वसाहतीच्या भागाचा पंढरपूर शहर हद्दीत समावेश होण्यासाठी पाठपुरावा करावा एवढीच अपेक्षा आ.रोहित पवार यांच्या समोर व्यक्त करायची होती.
– राजकुमार शहापूरकर
(संपादक : पंढरी वार्ता )
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

5 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

5 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago