कौटुंबिक वादातून पतीचा खून करून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे. रमेश भिसे (वय 44, रा.
लांडगे निवास, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी नंदिनी रमेश भिसे (वय 40) हिला अटक करण्यात आली आहे.
रमेश भिसे आणि त्याची पत्नी भाड्याने खोली घेऊन राहत होते. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाले. भिसे याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो पत्नीच्या चारित्र्यावरून तिचा संशय घेत असे. तो काही कामधंदा करत नव्हता. मध्यरात्री नंदिनीने पती रमेश याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने त्याच्या गळ्यात दोरी बांधून ती घरातील हुकाला अडकवली. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचत तसे तिने मुलगा तसेच नातेवाईकांना सांगितले.
भिसे याचा मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनात भिसेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी, मुलगा, नातेवाईकांची चौकशी केली. चौकशीत नंदिनीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पती चारित्र्याचा संशय घेऊन अपमान करायचा. तो काही कामधंदा करत नव्हता तसेच दारूला पैसे मागायचा, असे तिने पोलिसांना सांगितले.
पतीच्या त्रासामुळे त्याचा खून केल्याची कबुली तिने दिली. नंदिनीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…