घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सातजणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुह्यात नवीन कलमांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे वाढविण्यात आली आहेत.
संभाजीनगर रोडवरील एका व्यक्तीने फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभि बुलाखे व इतर चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या व्यक्तीच्या घरात 11 मार्च रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी प्रवेश करून घर खाली करण्यासाठी कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत घरातील सामानाची तोडफोड केली.
तसेच घर खाली करण्याच्या कारणासाठी 11 मार्च रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी त्यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलावून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. शिंदे व इतरांनी यापूर्वीदेखील फोन करून व घराचे नुकसान करून त्यांना घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता.
या तक्रारीनुसार तोफखाना पोलिसांनी नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुह्याचा तपास सुरू असताना घेण्यात आलेल्या जबाबानुसार पोलिसांनी कलमांची वाढ केली आहे. त्यामुळे नगरसेवक शिंदेंसह त्यांच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…