ताज्याघडामोडी

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल एनआयएच्या मुंबई शाखे कडे आला आहे. मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार असल्याचा उल्लेख मेल मध्ये असून त्यांना मारण्यासाठी 20 किलो आरडीएक्स तयार असल्याचे म्हणले आहे. धमकी देणाऱ्याने त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे २० गट सक्रिय झाल्याचे तसेच आरडीएक्सच्या साहाय्याने स्फोट घडवून मोदींचा घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे.

हल्ल्याची योजना तयार आहे. तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे म्हणले आहे. एनआयए कडून संबंधित मेलचा तपास सुरू आहे. तसेच गृहमंत्रालयाकडून इतर केंद्रीय तपास यंत्रणेला अलर्ट देण्यात आला आहे.

काय म्हणले आहे मेल मधे : या संदर्भात केलेल्या ईमेल मधे त्याने म्हणले आहे की, माझ्याकडे 20 किलो पेक्षा जास्त आरडीएक्स आहेत आणि मी 20 मोठे हल्ला करण्याची योजना आखली आ. हे हल्ले सर्व 20 प्रमुख शहरांमध्ये करण्याचे नियोजन केले आहे. मला जमेल तितक्या लवकर मोदींना मारायचे आहे. त्यामुळे मी मोठे बाॅंबस्फोट करणार आहे.

मोदींमुळे माझे जीवन नष्ट झाले आहे. मी आता कोणालाही सोडणार नाही. मी लाखो लोकांना मारणार आहे. मी त्यासाठी दहशतवाद्यांना भेटलो आहे. त्यांनी मला सहज आरडीएक्स उपलब्द करुन दिले आहे. मी सर्वत्र स्फोट करणार आहे. मला थांबवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर करा पण मी हल्ले करण्याचे पुर्ण नियोजन केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago