२०१४-१५ च्या गळीत हंगामात कारखान्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने सॉफ्ट लोन योजना मंजूर केली होती.राज्य शासनाने २०१४-१५ मध्ये गाळप हंगाम घेतलेल्या २२ सहकारी व खाजगी सहकारी साखर कारखान्यास व्याज अनुदान देण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला गेला होता.सॉफ्ट लोन योजनेत पात्र असलेल्या सहकारी साखर कारखान्याचे प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांनी राज्य शासनाकडे सादर केले होते.त्या बाबत काही साखर कारखानांना सॉफ्ट लोन वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आज ३१ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आदेश पारित केला असून त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा ९१२०००० इतक्या व्याज अनुदानास पात्र असून त्या पैकी ३४५२००० इतकी रक्कम या कारखान्यास मिळणार आहे.तर सहकार शिरोमणी साखर कारखान्यास ५५१८००० इतकी रक्कम प्राप्त होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविणात येणाऱ्या या योजने अंतर्गत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कोट्यवधी रुपये थकीत असून या पैकी हा काही प्रमाणात का होईना निधी प्राप्त होणार असल्याने आर्थिक संकटात असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास थोडा फार तरी आर्थिक आधार मिळणार आहे असेच म्हणावे लागेल.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…