“निर्व्यसनी जीवन हेच यशस्वी जीवन”- डॉ. प्रसन्न भातलवंडे

श्री पाडुरंग प्रतिष्ठिन संचलित कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे, मध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दंत शल्यचिकित्सक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉ. प्रसन्न भातलवंडे उपस्थित होते.डॉ.प्रसन्न भातलवंडे यांचा सत्कार, प्रशालेचे प्राचार्य सिबानारायण  दास यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. अनुजा मस्के  यांनी करून दिला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत दिनांक 29/03/2022 मार्च, २०२२ रोजी, इयत्ता 1ली ते 4 थी पहिला गट, इयत्ता ५वी ते ८वी दुसरा गट,  विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचे डॉ.भातलवंडे यांच्या हस्ते प्रशिस्त पत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले.प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक. आणि  उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

तर इयत्ता 1ली ते 5 वी गटातील   विजयी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे, प्रथम क्रमांक – प्रांजल काटकर, द्वितीय क्रमांक- सृष्टी शिंदे,  तृतीय क्रमांक – समर्थ आसबे, तर  सार्थक  घाडगे यास  उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.दुसर्‍या गटात प्रथम क्रमांक – पृथवीराज गाजरे, द्वितीय क्रमांक- प्राची पवार,  तृतीय क्रमांक – सक्षम कोळवले, तर  तानाजी चव्हाण  हिस उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

यावेळी डॉ.भातलवंडे म्हणाले की तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ पासून आणि काय आजार होतात यामध्ये कॅन्सर,तोंडाचे आजार,फुप्फुसाचे आजार,श्वसनाचे आजार, आणि तसेच सर्व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त शाळा व शाळेचे परिसर यासाठी शपथ देखील दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आचल कोळवले हिने केला, कु. अनुष्का कांबळे हिने विजेत्या ची नावे जीर्ण केली. तर आभार प्रदर्शन  कु. अमृता कोळवले हिने केला.

कलाशिक्षक पुंडलिक अंकुशराव यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.सर्व पारितोषिक विजेत्यांचे,संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक सर, संस्थेचे रजिस्टर श्री. गणेश वाळके सर, प्रशालेचे प्राचार्य श्री. सिबानारायण दास सर, उपप्राचार्य श्री. श्रीशैल शिरोळकर सर, व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago